सावंतवाडी वन विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद… 

88
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०५: येथील वनविभागामध्ये नव्याने दाखल झालेले वनरक्षक व वन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दुर्मिळ वनस्पतींची ओळख व संवर्धन याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यात वनस्पती तज्ञ मिलिंद पाटील व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुजित कुमार जाधव यांनी जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजातींची ओळख, त्यांचे औषधी गुणधर्म, रोपवाटिकेच्या माध्यमातून संवर्धन व संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनक्षेत्रपाल मदन शिरसागर, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक महादेव गेजगे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

\