बांदा येथील प्रसाद सावंतांचा ऊर्जा भूषण पुरस्काराने सन्मान….

165
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०८: वीज वितरण कंपनीचे कुडाळ विभाग प्रधान तंत्रज्ञ व बांदा येथील लाईनमन प्रसाद काशिनाथ सावंत यांना उर्जा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.विद्युत वाहीनी कर्मचारी श्री सावंत रा. इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील सुपुत्र सध्या महावितरण कंपनीत बांदा या ठिकाणी लाइनमन म्हणुन काम करत आहेत. त्या अगोदर सावंतवाडी, कुडाळ या भागात प्रामाणिकपणे अहोरात्र मेहनत घेत काम केले म्हणून वीज वितरण कंपनीच्या वतीने उर्जा भूषण पुरस्काराने रत्नागिरी परिमंडळ मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अधिक्षक अभियंता स्वप्नील काटकर व मान्यवर उपस्थित होते. श्री. सावंत यांचे वीज वितरण कंपनी आणि इन्सुली मध्ये कौतुक केले जात आहे.

\