निगुडेत घरावर झाड पडून नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही…

172
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

बांदा,ता.०९: निगुडे-जुनी देऊळवाडी येथील अंकुश निगुडकर यांच्या घरावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जांभळाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घराच्या बाजूला असणाऱ्या नारळाच्या झाडामुळे जांभळाचे झाड पूर्णता घरावर पडले नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घरामध्ये अंकुश निगुडकर व त्यांचे कुटुंबीय लहान मुलांसह राहतात. पहाटेच्या सुमारास झाड पडताना मोठ्याने आवाज आल्यामुळे लहान मुले घाबरली. रात्री संततधारपणे पाऊस कोसळत असल्यामुळे सदर झाड घरावर पडले. अंकुश निगुडकर यांचा मुलगा रमाकांत निगुडकर यांनी सदर घटनेची कल्पना निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांना दिली. सरपंच यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तलाठी यांना नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.

\