दहावी-बारावीत असताना तोल जाणार नाही याची दक्षता मुलांनी घ्यावी…

355
{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
2
Google search engine
Google search engine
Google search engine

निलेश राणेंचे आवाहन; सकल मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार…

सावंतवाडी,ता.०९: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करा. मुख्य म्हणजे दहावी-बारावीत असताना स्वतःचा तोल जाणार नाही, व्यसनाधीन होणार नाही, याची दक्षता घ्या, असे आवाहन माजी खासदार तथा भाजपा नेते निलेश राणे यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले. दरम्यान मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी जीवनात विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य दाखवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी सांगितले.

सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मुलांच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, युवराज लखमराजे भोसले, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष उद्योजक विशाल परब, सकल मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, भोसले इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य गजानन भोसले, माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,विलास जाधव, राघोजी सावंत , माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी राणे पुढे म्हणाले, मराठा समाज विद्यार्थ्यांना समाजासाठी लढणाऱ्या बाबतीत माहिती हवी. विद्यार्थ्यांना काय बनायचे तसं स्वातंत्र्य द्या. शिक्षणाची विविध दालने खुली झाली आहेत. त्यामाध्यमातून कौशल्य दाखवा. जगाच्या स्पर्धेत विद्यार्थी उभा राहिला पाहिजे. आयुष्यात पैसा महत्वाचा आहे. पण तो उभा करण्यासाठी कौशल्य गुणांचा उपयोग केला पाहिजे. थोरामोठ्यांना वाचा आणि जीवनमूल्ये निर्माण करा. माझ्या आयुष्यात दोन वेळा पराभव झाला तरी डगमगलो नाही. तर ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आई-वडिलांची मेहनत फुकट घालवू देऊ नका. शेतकरी दुबार पेरणी घेतो तशीच विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे.

माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या यशाचा गुणगौरव सोहळा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना आपल्या समाजाचा इतिहास माहित पाहिजे. इतिहास अभ्यासतो तो जीवनात यशस्वी होतो.

युवराज लखमराजे भोसले म्हणाले, दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील काळात स्पर्धा परीक्षात सहभाग घेतील. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवून विविध क्षेत्रात विद्यार्थी चमकतील. शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.

विशाल परब म्हणाले, विद्यार्थ्यांना यशाबद्दल शुभेच्छा देतानाच तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये सतत कार्यरत रहा.यावेळी पावणे दोनशे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

यावेळी राघोजी सावंत, माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, विलास जाधव, यशवंत आमोणकर, सुंदर गावडे, सौ. संयुक्ता गावडे , तारकेश सावंत, साईश गावडे योगिता गावडे, लवू लटम, सचिन सावंत,अमीत परब,अजय सावंत,जय भोसले,संजय लाड,दिगंबर नाईक,दिव्या बिरोडकर,प्रांजल बिरोडकर,सागर गावडे, प्रथमेश गावडे,साईश गावडे,दिव्येश बिरोडकर वैभव बिरोडकर विनोद सावंत,जयवंत घोगळे, आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक, स्वागत अध्यक्ष सिताराम गावडे यांनी तर सुत्रसंचलन जय भोसले यांनी केले.

\