माणगाव खोर्‍यात विजेची समस्या, संतप्त ग्रामस्थांचा अधिक्षक अभियंताना घेराव…

266
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आमदार वैभव नाईक आक्रमक; तात्काळ समस्या दुर करण्याच्या अधिकार्‍यांना सुचना…

कुडाळ,ता.१०: वीज समस्यांनी गेले अनेक दिवस हैराण झालेल्या माणगाववासिंयांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विज कंपनीचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत धारेवर धरले. यावेळी गेले अनेक दिवस माणगाव खोर्‍यात समस्या जाणवत आहेत. मात्र अधिकार्‍यांकडून लक्ष दिला जात नाही. त्यामुळे लवकरत-लवकर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना देण्यात आल्या.
दरम्यान काम करण्यासाठी आवश्यक असलेले कामगार उपलब्ध न झाल्यामुळे काही भागात काम रेंगाळले आहे. ते उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ ही कामे पुर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अधिकारी श्री. पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे,राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, नागेश ओरोसकर,कौशल जोशी, महेश जामदार, तुषार सामंत, दिलीप नीचम, अजित परब, बापू बागवे, एम बी गावडे, राजू गवंडे, बाळा वेंगुर्लेकर,संदीप सावंत, अमित राणे, दीपक आंगणे,अजित मार्गी, गौतमी गावकर आदी उपस्थित होते.

\