शालेय शिक्षण विभागाला मराठा आरक्षणाचा विसर…

38
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुहास सावंत; मुख्याध्यापकांकडे मागणी करा पालकांना आवाहन

कुडाळ,ता.१३: शिक्षण विभागाला मराठा आरक्षणाचा विसर पडला आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केला आहे.
वरिष्ठांनी आदेश दिले नसल्याने ११ वीच्या प्रवेशासाठी मराठा अंमलबजावणी होत नाही. मात्र आदेश मिळाल्यास तात्काळ अंमलबजावणी करू, असे शिक्षणाधिका-यांचे म्हणणे आहे त्यामुळे आता पालकांनीच शाळांच्या मुख्याध्यापकांकडे मराठा आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी करावी, असे आवाहन ही श्री. सावंत यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, शिक्षण विभागाला मराठा आरक्षणाचा विसर पडला आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. दरम्यान शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, वरिष्ठांनी आदेश दिले नसल्याने ११ वी च्या प्रवेशासाठी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. मात्र आदेश मिळाल्यास तात्काळ अंमलबजावणी करू, असे ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी शाळांच्या मुख्याध्यापकांकडे मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करा, असे आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे.

\