सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५१ हजार मुलांना मिळणार नवी पाठ्यपुस्तके…

156
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिक्षणाधिकार्‍यांची माहीती; नवागतांचे स्वागत करण्यासाठी उपक्रम राबविण्याच्या सुचना…

सिंधुदुर्गनगरी,ता.१३: नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जून पासून सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ३६० शाळांमधील ५१ हजार ५४६ मुलांना नव्याने पाठयपुस्तके मिळणार, अशी माहिती जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कळमळकर यांनी दिली आहे. दरम्यान शाळेत येणार्‍या नवागतांचे स्वागत करण्यासाठी प्रभातफेरी, पुष्पगुच्छ देवून स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि वृक्षारोपण असे विविध उपकम राबविण्यात यावेत अशा सुचना शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक संघ, माता पालक संघ, आदींना देण्यात आल्या आहेत.

\