विशाल परबांकडून सावंतवाडीतील मारुती मंदिरासाठी लाखाची देणगी..

234
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१५: येथील विठ्ठल मंदिर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या मारुती मंदिरासाठी भाजपाचे युवा नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी १ लाखाची मदत दिली. आज यातील ५० हजाराची रक्कम त्यांनी मंदिर समितीकडे सुपूर्द केली. श्री. परब यांच्या उपस्थितीत आज त्या ठिकाणी आरती करण्यात आली. यावेळी यापुढे लागेल ते सहकार्य आपण नक्कीच करू, असे आश्वासन श्री. परब यांनी त्या ठिकाणी जमलेल्या भक्तगणांसह कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, भुपेद्र सावंत, गौरी परुळेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, गणेश पडते, सुदेश नेवगी, अमित गवंडळकर आदी उपस्थित होते.

\