देवगडात दीक्षित फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

35
2
Google search engine
Google search engine
Google search engine

देवगड,ता.१५: येथील दीक्षित फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडेल नं. १ व प्राथमिक शाळा पुरळ-कसबा या दोन शाळांमधील ३० होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, छत्री, पेन, कंपास पेटी, पेन्सिल, असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. शैक्षणिक सुविधांच्या अभावी होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. त्यांनाही आनंदाने शिक्षण घेता यावे या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, डाॅ. आरोही दीक्षित, देवगड तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीरंग काळे, पडेल सरपंच भूषण पोकळे, श्रीनिवास मराठे, माजी सरपंच संजय मुळम, केंद्रप्रमुख अशोक जाधव, पुरळ सरपंच सौ. अनुश्री तावडे, उपसरपंच अनिल पुरळकर, माजी सरपंच सुनील तेली, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुरेश देवळेकर, श्रीराम केळकर आदी उपस्थित होते.

\