गुरांची वाहतूक, कर्नाटक येथील चौघे ताब्यात…

1233
2
Google search engine
Google search engine
Google search engine

.आंबोली पोलिसांची कारवाई; इनोव्हा कारच्या घेवून संशयितांची “पायलटिंग”…

सावंतवाडी,ता.१६: गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी कर्नाटक येथील चौघांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९ जनावरांसह इनोवा कार व १ ट्रक जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे इनोवा कार घेऊन संशयीतांकडून “पायलटिंग” सुरू होती. मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. ही कारवाई आज पहाटे आंबोली चेकपोस्टवर करण्यात आली. यात २ गाड्या व बैल मिळून तब्बल २७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सैफअली अयुबहुसैन मडीवाले, (वय-३०, रा. जळगाव पिरणवाडी, ता.जिंदतनगर. जि. बेळगाव) अदनान रमजान बेपारी ( वय २३, रा.घर नं.१८, कसाई गल्ली, कॅम्प, जि. बेळगाव) नविदअलीखान मोहम्मदअलीखान पठाण (वय-३२, रा. बेळगाव-पिरणवाडी, ता. बेळगाव) व इसा बहूद्दीन बेपारी, (वय-२३, रा. घर नं.३६, बेळगाव मार्केट इस्टेट, ता.जि. बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या चौघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मालवाहू ट्रकसह पायलटींग करणारी इनोव्हा कार सावंतवाडी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार दीपक शिंदे, पोलीस नाईक मनीष शिंदे, पोलीस हवालदार अभी कांबळी,पोलीस कॉन्स्टेबल आनंद बरागडे, पिरणकर यांनी ही धडक कारवाई केली आहे. तर पकडलेली गुरे गोवा करासवाड- शिकेरी येथील गो शाळेत सुखरूप पाठवण्यात आली.

\