पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भालावल येथिल यशची दमदार कामगिरी…

94
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुवर्णपदकासह स्ट्रॉंग मॅन टायटल जिंकले; अर्चना घारे यांच्या माध्यमातून सन्मान…

सावंतवाडी,ता.१७: नॅशनल जुनियर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये भालावल येथील यश परब याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ४ सुवर्णपदके व स्ट्रॉंगमॅन टायटल जिंकले आहे. याबद्दल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अर्चना घारे यांच्या हस्ते यश याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी यश याने कठोर परिश्रमांच्या जोरावर अवघ्या कोकणची मान उंचावली आहे, त्यामुळे त्याच्या पाठिशी आम्ही कायम खंबीरपणे उभे आहोत, असे मत सौ. घारे यांनी व्यक्त केले. यावेळी यशचे वडील भरत परब, विनायक परब, अँड. सिद्धी परब, रामदास गवस, मयूर कामत, वेद परब, चंद्रशेखर परब, सिद्धेश परब, वैभव परब आदींसह भालावल येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

\