सिंधुदुर्गात १९ ते १ जुलै या कालावधीत होणार पोलिस भरती…

248
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सौरभ कुमार अग्रवाल; पाऊस असला तरी मैदानी चाचणीवर दुष्परिणाम नाही…

ओरोस,ता.१७: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात १९ जूनला एकाच वेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात सुद्धा १९ ते १ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आज येथे दिली.
दरम्यान या कालावधीत जिल्ह्यात पाऊस जास्त असल्याची शक्यता आहे. परंतु मैदानी चाचणीवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, किंवा कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली.

\