शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा विधान भवना समोर आंदोलन…

148
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अर्चना घारेंचा इशारा; कर्जमाफी प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी वेधले लक्ष…

सावंतवाडी,ता.१९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, प्रोत्साहन पर अनुदान आदी प्रश्नांबबत तात्काळ शासनाने लक्ष घालून योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अन्यथा ३ जुलैपासून जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शरद पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे यांनी दिला आहे.

याबाबत आज त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. यावेळी गेले अनेक दिवस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. प्रोत्साहन पर अनुदान मिळाले नाही. त्यामुळे याबाबत तात्काळ लाभ देण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अन्यथा पावसाळी अधिवेशनात विधानभवनासमोर शेतकऱ्यांसह ठाण मांडून बसून, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, महिला जिल्हाध्यक्षा अँड. रेवती राणे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी विधानसभा युवती अध्यक्ष सुनीता भाईप, सावंतवाडी तालुका युवती अध्यक्ष सुधा सावंत आदी उपस्थित होते.

\