राणेंना फक्त बाक वाजविण्यासाठी सभागृहात बसवलं का…?

257
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जयेंद्र परूळेकर; मल्टी स्पेशलिटीचे गाजर नको, आहे ते रुग्णालय सुधारा…

सावंतवाडी,ता.२०: केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांच्याकडून त्यांचे मंत्रीपद काढून घेऊन मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्या प्रमाणे भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना फक्त बाक वाजवण्यासाठी सभागृहात बसवल का? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी आज येथे केला. दरम्यान सावंतवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे गाजर लोकांना दाखवण्यापेक्षा मंत्री दीपक केसरकरांनी आहे ते सरकारी हॉस्पिटल सुधारा, तसेच चतुर्थी पूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.

परूळेकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी नारायण राणे व दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणे त्यांच्यासाठी प्रचार सभा घेत तुम्हाला संसदेत बाक वाजवणारा खासदार पाहिजे की, लोकांचे प्रश्न सोडवणारा खासदार? असा सवाल केला होता. मात्र जनतेने विश्वासाने निवडून देऊनही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी राणे यांना बाक वाजवणारा खासदार म्हणून संसदेत ठेवले आहे. एकूणच राणे यांच्या जवळ असलेले सूक्ष्म लघु व मध्यम हे मंत्रीपद दुसऱ्याला देऊन एक प्रकारे कोकणी जनतेचा अपमान केला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.

नारायण राणे यांनी खासदारकीचा उपयोग इथल्या जनतेसाठी जनतेचे जीवन सुखर होण्यासाठी करावा. कोकणचा विचार करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अवैद्य मार्गाकडे युवक चालले आहे. त्यामुळे येथील जनतेचे भविष्य धुसर आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले, आज इथली आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर आहे. उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन येऊनही ती कोणाच्या प्रतीक्षेत आहे? ती का सुरू होत नाही? असा सवाल त्यांनी केला. ही इथल्या आरोग्य यंत्रणेची नामुष्की आहे, त्यामुळे मंत्री केसरकर यांनी मल्टीस्पेशालिटी चे गाजर दाखवण्यापेक्षा आहे त्याच आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करावी.

\