कासार्डे माध्यमिक विद्यालयात योगाचे बहारदार प्रात्यक्षिक लक्षवेधी…

388
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.२१: तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन विद्यार्थ्यांनी बहारदार योग प्रात्यक्षिके सादर करून साजरा केला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही. राणे, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व योग शिक्षिका प्रियंका सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रात्यक्षिकामध्ये प्रशालेतील १ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रारंभी प्रास्ताविकात प्रशालेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी योगाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी योगाचा नियमित सराव करुन आयुष्य आनंदी व निरोगी ठेवण्याचा संदेश दिला. मुख्याध्यापिका सौ बी.बी. बिसुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानवी जीवनात योगाचे महत्त्व फार मोठे असून, निरोगी व सुदृढ शरीर ठेवण्यास आयुष्यभर योग साथ करेल. त्यासाठी प्रत्येकाने योगाची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले.

समृद्धी चौगुले, दूर्वा पाटील, सोनम चौहाण, वृषाल निकम, कल्पेश निकम, अनिशा खान, ध्रुव शेट्ये आणि अमोल जाधव आदी योगा खेळाडुंनी विविध योगासनाची मनमोहक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुत्रसंचलन प्रियंका सुतार यांनी केले तर शेवटी पर्यवेक्षक एस.व्ही. राणे यांनी आभार मानले.

\