होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा मृतदेह आढळला…?

996
2
Google search engine
Google search engine
Google search engine

टीशर्ट वरून ओळख पटली; नातेवाईकांना माहिती दिल्याचे पोलीस निरीक्षकांची माहिती…

मालवण,ता.२१: तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५) या मच्छिमाराचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत तब्बल १३ दिवसांनी रेवदंडा येथील किनाऱ्यावर आढळून आला आहे. त्याच्या अंगातील कपड्यावरून ओळख पटली असून चोडणेकर यांच्या नातेवाईकांना याठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय -५५) हे ८ जुन रोजी मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय- १४) वर्षे आणि खलाशी धोंडीराज परब (वय- ५५ वर्षे, रा. तारकर्ली) यांसह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. हे मच्छीमार सर्जेकोट तळाशील येथे मच्छीमारी करत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास होडी उलटली. तीनही जण समुद्रात बुडाले. लावण्य हा पोहून बाहेर आला आणि बचावला. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह घटनेच्या दुसऱ्या दिवशी सापडला. मात्र किशोर यांचा अद्यापही शोध लागला नव्हता. स्थानिक ग्रामस्थ, शोध पथक, पोलीस तसेच प्रशासन यंत्रणा, कोस्ट गार्ड हॅलीकॉप्टर तसेच जिल्हा पोलीस प्रशासन टीमने ड्रोनद्वारे त्यांची शोध मोहीम घेतली. दरम्यान आज सकाळी रेवदांडा समुद्रकिनारी अज्ञात मृतदेह मिळून आला. या मृतदेहाच्या अंगावर असलेल्या टी शर्टवर घाटकोपर भटवाडी साईदर्शन असा उल्लेख असल्याने हा फोटो घाटकोपर मध्ये व्हायरल झाला. त्यानंतर हा मृतदेह चोडणेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

\