मालपे-पेडणे येथे बांधलेली संरक्षण भिंत कोसळली…

923
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जीवीतहानी नाही; मात्र निकृष्ट व दर्जाहीन काम केल्याचा स्थानिकांचा आरोप…

 

बांदा,ता.२२: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मालपे-पेडणे येथे बांधलेली संरक्षण भिंत कोसळली. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणीही जीवीतहानी झाली नाही. निकृष्ट व दर्जाहीन काम करण्यात आल्यानेच भिंत कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सुदैवाने या अपघातात एखादी दुर्घटना घडली नाही. परंतु सुदैवाने एक वाहन आणि त्यामध्ये चार माणसं जात असतानाच त्या अगोदर भिंत कोसळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते म्हाखाजण धारगळ पर्यंत चा राष्ट्रीय महामार्ग ६६ या बांधकामाचे कंत्राट खासगी कंपनीला दिलेले आहे. आणि या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि डांबरीकरण रस्त्याचे काम करत असताना कसल्याच प्रकारची स्थानिकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने या रस्त्याचे काम केले आहे.

मालपे राष्ट्रीय महामार्ग करत असताना बायपास रस्ता केला होता. गेल्यावर्षी हा रस्ता करत असताना मोठ्या प्रमाणात दरड कोसळून पूर्ण रस्ता बंद होता. त्याच वेळी या रस्त्यावरून जर वाहने ये जा करत असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने हा रस्ता त्यावेळी पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे पूर्वीचा जो राष्ट्रीय महामार्ग १७ होतात त्याच रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहने जात होती. परंतु राष्ट्रीय महामार्ग ६६ तयार करताना हा बायपास रस्ता केला आहे. आणि या बायपास रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दरड आहे. दरड कट करताना किंवा डोंगराची माती कापताना सरळ रेषेत कापल्यामुळे भविष्यात ही दरड कोसळू शकते. आणि मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

या रस्त्यावरील संरक्षण भिंतीच बांधकाम कशा पद्धतीने केलं यावर अनेक जागृत नागरिकांनी आवाज उठवला. परंतु याकडे सरकार आणि सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही. या रस्त्याच्या बाजूला भले मोठे डोंगर आहेत. आणि डोंगर सरळ रेषेत कट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दरड अजूनही कोसळण्याची भीती आतापासून व्यक्त होत आहे. तरीही सरकारला जाग आलेली नाही. त्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सध्या पावसाचा जरी जोर नसला तरी पहिल्याच पावसाने राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील ही जी संरक्षण भिंत आहे. त्या भिंतीला पावसाने आपली धडक दिली. आणि काही प्रमाणात ही भिंत आज सकाळी १० वाजता कोसळली याच रस्त्यावरून महाराष्ट्रात जाणारी एक चार चाकी वाहन आणि त्यामध्ये चार माणसं होती. ती सुदैवाने बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही भिंत जी उर्वरित आहे ती सुद्धा कोसळण्याची शक्यता आहे. कंत्राटदारने ज्या पद्धतीने डोंगर कापून रस्ता केला ती पद्धत चुकीची आहे. रस्ता करत असताना सरळ रेषेत दरड कापल्यामुळे डोंगर कोसळत असून जी संरक्षण भिंत उर्वरित आहे ती सुद्धा कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

\