युवा फोरम संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेनकोट वाटप…

69
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२४: येथील युवा फोरम इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पिंगुळी व रानबाबुंळी या गावातील शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी यशवर्धन राणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी युवा फोरम इंडिया संस्थेचे सदस्य केतन शिरोडकर, रोहन करमळकर, सर्वेश पासवसकर, भूषण गावडे, दीपक रावळ, अनुप जाधव, सिद्धेश परब, रवी आदींसह शेतकरी उपस्थित होते.