भोसले स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहोदया कोल्हापूर यांच्यातर्फे सत्कार…  

82
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२६: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील दहावी प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या आर्यन हिर्लेकर तसेच शाळेचे गणित शिक्षक संदीप पेडणेकर यांचा सत्कार सहोदया कॉम्प्लेक्स, कोल्हापूर या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

सहोदया  सीबीएसई बोर्ड संलग्न संपूर्ण भारतभर पसरलेली संस्था असून देशभरात विभागवार तिच्या शाखा आहेत. दर शैक्षणिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थी तसेच शिक्षकांचा सन्मान सहोदया मार्फत करण्यात येतो. यावेळी सहोदया कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षा सस्मिता मोहंती, उपाध्यक्षा जयश्री जाधव, सचिव पूजा चोप्रा आदी उपस्थित होत्या.

\