कोकण पदवीधर निवडणुकीसाठी बांदा शहरात ७४.५४ टक्के मतदान…

280
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२६: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी बांदा शहरात ७४.५४ टक्के मतदान झाले. ९२७ पैकी ६९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला. येथील खेमराज हायस्कुलच्या मतदान केंद्राबाहेर भाजप महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बूथ होता.
आज दिवसभर पाऊस असल्याने याचा सकाळच्या सत्रात मतदानावर थोडाफार परिणाम झाला. सायंकाळी मतदान झाल्याने टक्का वाढला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे भोसले यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट देत मतदानाचा आढावा घेतला.
यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, महिला मंडल अध्यक्ष रुपाली शिरसाट, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, भाजप बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, गुरु कल्याणकर, सिद्धेश महाजन, निलेश कदम, राकेश केसरकर, भैय्या गोवेकर, मधु देसाई, समीर कल्याणकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\