कुडाळात २९ जूनला शालेय विद्यार्थ्यांसाठी “उमंग” करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन…

127
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२७: येथील रोटरी क्लब, एमकेसीएल आणि सिंधू संकल्प अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जूनला शालेय विद्यार्थ्यांसाठी “उमंग” मोफत करियर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत हा मेळावा होणार आहे. दिवसभर विविध करियर क्षेत्रातील संधी या विषयावर नामांकित तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कुडाळ रोटरी क्लब अध्यक्ष दिनेश आजगावकर, रोटरीचे असि. गव्हर्नर बोभाटे, गव्हर्नर एरिया एड गजानन कांदळगावकर, सिंधुसंकल्प अकादमी, कुडाळचे केदार देसाई, एमकेसीएल चे प्रतिनिधी देवेंद्र गावडे, राकेश तिरोडकर, भूषण तेजम आदि उपस्थित होते. या मेळाव्याची माहिती देताना प्रणय तेली म्हणाले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशोर तावडे असून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि डॉ. अमेय देसाई या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहोत. तसेच सारथीच्या सहसंचालिका किरण कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि एमकेसीएलचे जनरल मॅनेजर विकास देसाई व अमित रानडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या मार्गदर्शन शिबिरामध्ये आयपीएस ऑफिसर आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, कुडाळ तहसीलदार वीरसिंह वसावे, पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, डॉक्टर संजय केसरे, डॉक्टर संजय सावंत, नितीन वाळके, शिवानंद भिडे, प्रणाली मयेकर, केदार देसाई, राजेश मोंडकर हे विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गोवा येथील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते सुभाष साजणे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याप्रसंगी एमकेसीएलच्या करिअर ॲपचे अनावरण होणार असून उपस्थित विद्यार्थ्यांना एमकेसीएल करिअर ॲप मोफत दिले जाणार आहे. तसेच एमकेसीएल ओलंपियाड मुमेन्ट या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे यांच्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सरसेनापती वीर बाजी पासलकर ‘सारथी संगणक शिकता शिकता काम’ उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपण स्वतःतून आपल्या पालकांना कृतज्ञता पर भेटवस्तू दिलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक या प्रसंगी होईल.

त्याचप्रमाणे उदयोन्मुख करिअर घडविणाऱ्या काही व्यक्तींचे या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात गौरव करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावे अशी सिद्धी शिवानंद भिडे या विद्यार्थिनीचा देखील सत्कार केला जाणार आहे. या शिबिरामध्ये यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा, कॉमर्स मधील करिअर्स, मेडिकल मधील करिअर, माहिती तंत्रज्ञानातील करिअर, करिअर करताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय. गणित आणि विज्ञानातील करिअर, अभिनय क्षेत्रातील करिअर्स, पॅरामेडिकल क्षेत्रातील करिअर, पत्रकारितेतील करियर अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हे शिबिर पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांची सकाळी नाष्ट्याची दुपारी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या कार्यक्रमासाठी रोटरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव बिले रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे सचिन गावडे संजय पुनाळेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या शिबिराचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रणय तेली यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.

\