चतुर्थी पूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण व्हावे…

1022
2
Google search engine
Google search engine

नारायण राणेंची मागणी; मंत्री नितीन गडकरींचे सकारात्मक आश्वासन…

सावंतवाडी,ता.२८: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी पूर्वी मार्गी लावा, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. दरम्यान पत्रादेवी ते राजापूर महामार्गाचे सुशोभिकरण करण्यात यावे याकडे ही त्यांनी लक्ष वेधले आहे.

श्री. राणे यांनी दिल्ली येथे जाऊन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आपण जातिनिशी लक्ष घालून हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन श्री. गडकरी यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. हे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास न्यावे यासाठी असणारा अडचणींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या सकारात्मक चर्चेतून महामार्ग चौपदरीकरणाचे काम यापुढे जलद गतीने सुरू होईल. नागरिकांचे, प्रवाशांचे होणारे हाल संपतील असा विश्वास निर्माण झाला आहे.