दस्त नोंदणीचे कामकाज ३१ मार्च पर्यंत राहणार बंद…

92
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२२:  दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आजही दस्त नोंदणी सुरू आहे. दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मोठी गर्दी होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने गर्दी होणार नाही याची प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये होणारी दस्त नोंदणी दिनांक ३१ मार्च २०२० रोजीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी बायोमेट्रीक प्रणालीचा वापर केला जातो. दस्त नोंदणीसाठी या कार्यालयामध्ये गर्दीही होत आहे. या मुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका आहे. गर्दीमुळे संसर्ग होण्याचीही भिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सदर कार्यालयातील दस्त नोंदणी बंद करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ७१, १४१ तसेच भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी या कळवितात.