वैभववाडीत विविध क्षेत्रातील १५० जणांचा कोविड योध्दा पुरस्काराने सन्मान…

105
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपचे आयोजन….

वैभववाडी,ता.२३:

भाजपा नेते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रातील १५० अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांना कोव्हीड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन मधील भव्य सभागृहात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, मुख्याधिकारी सुरज कांबळे, शहर प्रभारी सुदन बांदिवडेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती अक्षता डाफळे, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, नायब तहसीलदार अशोक नाईक आदी उपस्थित होते.
कोव्हीड योध्दा म्हणून तहसीलदार रामदास झळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, मुख्याधिकारी सुरज कांबळे, पोलीस प्रतिनिधी श्री राठोड यांना सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या गावात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी काही अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले काम घेतलेली मेहनत वैभववाडीवासिय विसरू शकत नाही. अशा सर्वांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. आरोग्य विभागातील सर्व आरोग्य सेवक, सेविका, अधिकारी, आशा स्वयंसेविका, पोलीस अधिकारी, सर्व गावचे सरपंच, नगरपंचायतचे स्वच्छतादूत व इतर कर्मचारी अधिकारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सर्वांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

_आ. नितेश राणे खरे कोरोना योद्धे_

आ. नितेश राणे हे खरे कोरोना योध्दे आहेत. या राष्ट्रीय आपत्तीत त्यांनी जनतेसाठी दिलेले योगदान फार मोठी आहे. अशी प्रतिक्रिया तहसीलदार रामदास झळके यांनी दिली. ते पुढे म्हणाले, आ. नितेश राणे यांच्या वाढदिनी समाजात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोव्हीड योध्दा पुरस्काराने सत्कार करण्यात आला. त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच आमदार नितेश राणे यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

_आ. नितेश राणे यांचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य_

कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या निधीची वाट न बघता आरोग्य प्रशासनाला आमदार नितेश राणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. पीपीई किट, मास्क व औषधे त्यांनी दिल्यामुळे ग्रामीण भागात काम करणे अधिक सोपे झाले. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांची शाबासकी ही कायम असते. त्यामुळे काम करण्यास उत्साह मिळतो. तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. ते सर्व बरे होऊन घरी आले आहेत. परंतु पुढे आपल्याला अजूनही लढायच आहे. आरोग्य प्रशासन यापुढेही प्रत्येक बाबतीत खबरदारी घेत राहील असे सांगितले. त्यांनी आमदार नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, बाळा हरयाण, किशोर दळवी, हुसेन लांजेकर, हर्षद हरयाण, दुर्वा खानविलकर, सज्जन रावराणे, संताजी रावराणे, बंड्या मांजरेकर, संतोष पवार, संजय चव्हाण, बाबा कोकाटे, समिता कुडाळकर, प्राची तावडे, सीमा नानिवडेकर, संजय सावंत, शुभांगी पवार, दीपा गजोबार, भारती रावराणे, प्रकाश पाटील, प्रदिप नारकर, रत्नाकर कदम, स्वप्नील खानविलकर, दाजी पाटणकर, बोबडे सर, रवींद्र तांबे, उदय पांचाळ, अमोल मोरे, शिवाजी राणे, नवलराज काळे, संजय शिवगण, महेश रावराणे, वैभव कोकाटे, लहू पवार, आशिष रावराणे, समीर माईणकर, अक्षय पाटील तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभववाडी तालुका भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा कोकाटे यांनी केले.

 

\