कोरोनावर मात करण्यासाठी सिंधुदुर्गात प्लाझमा बँक तयार करा…

211
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नितेश राणे; जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदनाद्वारे मागणी…

कणकवली,ता.२९: कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर प्लाझमा थेरपी उपचार केल्यास पेशंट लवकर बरे होतात .त्यामुळे सिंधुदुर्गात प्लाझमा बँक तयार करून रुग्णांवर उपचार करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.
राणे यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्याकडे केलेल्या मागणीत जिल्ह्यासाठी प्लाझमा बँक महत्वाची असून, ती तयार करण्यासाठी प्रस्थाव तयार करण्याचे सूचित केले आहे. सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे सुमारे १५२ रूग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत. सदर कोरोनाचे उपचार होऊन बरे झालेल्या रूग्णांच्या शरीरामध्ये कोरोना विरूध्द अँटीबॉडी तयार झाली आहे. त्यामुळे या रूग्णांच्या ब्लडमधील प्लाइमा जमा करून त्यांची प्लाइमा बँक तयार केल्यास त्याआधारे सद्याच्या व भविष्यातील रूग्णांवर उपचार केल्यास पेशंट लवकर बरे होतील व जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होईल. तरी याप्रमाणे कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, असे राणे यांनी म्हटले आहे.

\