लूट थांबविण्यासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये कॅशलेसची सक्ती करा…

245
2
Google search engine
Google search engine

नितेश राणे; कीट व निर्जंतुकीकरणाचे पैसे विम्यात समाविष्ट करण्याची मागणी…

कणकवली,ता.१२: सर्वसामान्य रुग्णांची होणारी लूट लक्षात घेता राज्यातील सर्व कोविड हॉस्पिटल मध्ये सक्तीने कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना द्याव्यात,अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. दरम्यान किट आणि निर्जंतुकीकरण करण्याचे पैसे आरोग्य विम्यात समाविष्ट करण्यात यावे,जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना त्याचा फटका बसणार नाही,असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की,गेल्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन हा एकच पर्याय राबविला जात आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश लोकांचा रोजगार गेला आहे. ज्यांच्याकडे रोजगार आहेत त्यांना पगार कपात होऊन मिळत आहे. काही ठराविकच कंपन्या किंवा ऑफिस मध्ये पूर्ण पगार देत आहेत. आरोग्यविमा असून सुद्धा काही कोवीड हॉस्पिटल कॅशलेस सुविधा देत नाहीत. असेच आरोग्य विम्यामध्ये किट व निर्जंतुकीकरणचे पैसे ग्राह्य धरले जात नाहीत.प्रायव्हेट कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होताना पन्नास हजार ते एक लाखपर्यंत अनामत रक्कम आकारली जाते. तर काही कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनची व्यवस्था करण्यास सांगतात. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक सुद्धा बाधित होत आहेत. अगोदरच कोरोना महामारीमुळेच ग्रस्त झालेल्या नागरिकांना या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे,अशा परिस्थितीत कोरोना बाधित रुग्ण होत आहेत.त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.