कणकवलीच्या सुजल पिळणकरचे बॉडीबिल्डिंग स्पर्धेत यश…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जागतिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल

 

कणकवली, ता.०७: कणकवली शहरातील वरचीवाडी येथील सुजल पिळणकर याने जागतिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवत भारताचा तिरंगा मोठ्या दिमाखात जगात फडकवला आहे. गिरणी कामगाराचा मुलगा ते सिल्वर मेडल पर्यंतचा सुजल यांचा प्रवास थक्क करणारा असाच आहे.

उझबेकिस्तान मध्ये पार पडलेल्या जागतिक बॉडिबिल्डिंग स्पर्धेत सुजल पिळणकर याने सिल्व्हर मेडल ची कमाई केली आहे. सुजलच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सुजलच्या या यशाने कणकवली शहराचे नावही बॉडिबिल्डिंग मध्ये जागतिक नकाशावर कोरले गेले आहे .

\