किशोर सोनसुरकर यांचा “बॉडी बिल्डिंग रिअल आयकॉन अवॉर्ड २०२१” ने सन्मान..

2
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले, ता.१७: सिंधुदुर्ग मधून अतिशय प्रतिकूल परिस्तिथी मध्ये “सिंधुदुर्ग श्री” 5 वेळा, “महाराष्ट्र कामगार श्री” ते वयाच्या ४६ व्या वर्षी स्वतः “मास्टर आशिया श्री” चतुर्थ क्रमांक व भारतीय शरीर सौष्ठव इतिहासात वडील व मुलगा एकाच व्यासपीठावर हा सुवर्ण योग अनुभवत मुलगा अंकित किशोर सोनसुरकर “ज्यु आशिया श्री” पाचवा यासह अनेक ‘किताब पटकविणारे आर. के. पाटकर हायस्कुल वेंगुर्ला चे क्रीडा शिक्षक किशोर सोनसुरकर यांचा इचलकरंजी येथे “बॉडी बिल्डिंग रिअल आयकॉन अवॉर्ड 2021” देऊन पोलीस निरीक्षक श्री विकास अडसूळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
इचलकरंजी येथे फिजिक जिम उद्योग समूह च्या नूतन जिम शुभारंभ प्रसंगी हा गौरव करण्यात आला.ज्यांच्याकडे पाहून तरुणांनी व्ययाम सुरू केला, शरीर सौष्ठव पटूंनी अनेक शरीर सौष्ठव स्पर्धा गाजवविल्या त्यांचा यथोचित सन्मान करून आजच्या तरुण, उदयोन्मुख व्ययाम पटूना मार्गदर्शन व्हावे म्हणून अनेक मानाच्या पुरस्काराचे मानकरी संग्राम चौगुले यांनी हा सोहळा घडऊन आणला. यावेळी विक्रम यामगेकर कामगार श्री, शिवाजी विद्यापीठ पदक विजेते, श्री मधुकर भुईगडे ज्यू महाराष्ट्र श्री, श्री भरत पाटील कोल्हापूर श्री विजेते, शिवाजी विद्यापीठ पदक विजेते, श्री नवनाथ साळुंखे मुंबई श्री विजेते, ज्यू महाराष्ट्र श्री राजेश वडाम यांचा रिअल बॉडी बिल्डिंग आयकॉन अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर इचलकरंजी पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार, आंतरराष्ट्रीय खेळाडू मनोज पाटील, अंतर राष्ट्रीय खेळाडू संग्राम चौगुले, जेष्ठ शरीर सौस्तव पटू तानाजी पोवार आदी मान्यवर उपस्तीत होते.
भविष्यात अश्या प्रकारे ज्येष्ठ व्ययामपटू यांचा भव्य दिव्य सन्मान सोहळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. श्री. किशोर सोनसुरकर यांना मिळालेल्या या पुरस्कार बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.