वेर्ले येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१२: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेर्ले नं. २ अमृत महोत्सवी समिती आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेर्ले प्राथमिक शाळा नं. २ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन व शारदेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमृतमहोत्सव समिती अध्यक्ष विष्णू राऊळ, समिती उपाध्यक्ष प्रसाद गावडे, वेर्ले उपसरपंच सुभाष राऊळ, ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सल्लागार माजी पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, तालुका कार्यकारिणी अध्यक्ष सुनिल राऊळ, उपाध्यक्ष दीपक तारी, रविंद्र मडगावकर, पंढरी राउळ, सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, तालुका सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, कार्यकारिणी सदस्य रविंद्र तावडे, महेश रेमुळकर, वेंगुर्ला कार्यकारिणी सदस्या समृद्धी पिळणकर यांच्यासह पडवे मेडीकल काॅलेज रक्तपेढीचे डाॅक्टर व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी वेर्ले ग्रामस्थांनी आपल्या शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करुन रक्तसंकलनासारखे पवित्र कार्य पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले व आपल्या या अमृततूल्य सत्कार्यात आमच्या संस्थेला सहभागी करुन घेतल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले, त्याचबरोबर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदान, देहदान, अवयवदान, रुग्णमित्र आणि मित्रसंस्था या पंचसूत्रीविषयी विस्तृतपणे विवेचन करतानाच बाॅम्बे ब्लड ग्रुप व थॅलेसेमिया आजार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जळवी यांनी केले तर आभार प्रसाद गावडे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने दात्यानी रक्तदान केले.

\