स्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्याचे नाव देशात कायम अग्रेसर राहील…

240
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुख्य कार्यकारी अधिका-यांचा विश्वास; जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रतिपादन…

सिंधुदुर्गनगरी,ता.२०:  जिल्ह्यातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत असणा-या सवयीमुळेच जिल्हाला “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत स्वच्छतेचे विविध पुरस्कार मिळाले आहेत.यापुढेही जिल्हावासियांच्या स्वच्छता सवयीमुळे जिल्ह्याचे नाव देशात स्वच्छता क्षेत्रात कायम अग्रेसर राहिल,असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र पराडकर यांनी व्यक्त केला.  जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधुन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जागतिक शौचालय दिनाचे आयोजन ग्रामपंचायत इन्सुली, ता. सावंतवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. राजेद्र पराडकर, सावंतवाडी पंचायत समिती सभापती, श्रीम. मानसी धुरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री. विनायक ठाकुर, जिल्हा परिषद सदस्य, श्रीम. उन्नती धुरी, गट विकास अधिकारी , पंचायत समिती सावंतवाडी श्री. वासुदेव नाईक, पोलिस पाटिल इन्सुली, जागृती गावडे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. संजय राणे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (पाणी व स्वच्छता) श्री. संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सभापती श्रीम. मानसी धुरी यांच्या हस्ते श्री. संजय लक्ष्मण भिसे क्षेत्रफळवाडी येथिल वैयक्तिक शौचलय बांधकाम शुभारंभ करण्यात आला.

\