कुणकेश्वर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न…

3
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल; सीसीटिव्हीचे नुकसान…

देवगड,ता.२२: कुणकेश्वर येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्याकडुन चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्य दरवाज्याची कडी तुटलेली दिसल्याने हा प्रकार उघड झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. यात काही चोरीला गेले नसले तरी संबधित चोरट्याने सीसीटिव्हीचे नुकसान केले आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडला असावा, असा संशय आहे. दरम्यान व्यवस्थापक मकरंद बाबूराव सक्रु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देवगड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\