पाडलोस माजी सरपंच विजय कुडतरकर यांचे निधन…

4
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.१८: पाडलोस-बामणवाडी येथील लक्ष्मण(विजय) कृष्णा कुडतरकर (65) यांचे दुःखद निधन झाले. त्यांना सामाजिक नाटकांची आवड होती व स्वतः नाटके बसवायचे. नाटकात काम करण्यापासून ते दिग्दर्शनही करायचे. भित्ती चित्रे काढण्यात त्यांचा हातखंडा होता. सामाजिक क्षेत्रात त्यांनी मडुरा दशक्रोशीत आपला ठसा उमटवला. विजय कुडतरकर पाडलोस गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरले अन सरपंच बनून गावाच्या प्रगतीची धुरा हाती घेतली. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पच्छात मुलगा, मुलगी, बहिणी, असा परिवार आहे.

\