आंबोली घाट रस्त्याचे डागडुगीचे काम नित्कृष्ट..

9
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष; ग्रामस्थातून तीव्र संताप, चौकशीची मागणी…

आंबोली,ता.१३: येथील घाट रस्त्याच्या डागडुजीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. या कामाची गंभीर दखल घेऊन हे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी अधिकाऱ्याने प्रयत्न करावा, अशी मागणी शिवसेनेच्या माध्यमातून अजित नार्वेकर, राजू राऊळ, नारायण चव्हाण, उत्तम नार्वेकर आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. याबाबत गंभीर भूमिका न घेतल्यास आंदोलन छेडू असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे
यात असे नमुद केले आहे की, आंबोली घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून ठिकठिकाणी मोटरसायकलस्वार तसेच छोट्या-मोठ्या कारचे अपघात हे खड्डे चुकवण्याच्या नादात होत आहेत. या खड्ड्यांमध्ये मोठाली खडी घालून थोडेफार डांबर मारून खड्डे मुजवल्याचे अक्षरशः नाटक करण्यात आलेले आहे. हे स्पष्ट दिसत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित ठेकेदाराची बिले देण्यात येऊ नयेत, अशी मागणी आंबोली ग्रामस्थ करणार असल्याचे समजते. या विरुद्ध आंबोली घाट मार्ग संपल्यानंतर दाणोली ते सावंतवाडी या दरम्याने पडलेले खड्डे हे अतिशय उत्कृष्टरित्या संबंधित ठेकेदाराने बुजवले आहेत तसेच खड्डे आंबोली घाटातही मुजवणे गरजेचे होते परंतु तसे काम झाले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व काळ्या यादीत या ठेकेदाराला टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या अजित नार्वेकर राजू राऊळ नारायण चव्हाण उत्तम नार्वेकर यांनी केली आहे .तसेच संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ कारवाई करून खड्डे सुस्थितीत न मुजवल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

\