कच्च्या तेलाचे भाव घसरलेले असताना देशात जुनेच दर का…?

35
2
Google search engine
Google search engine
Google search engine

इर्शाद शेख; पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याची सिंधुदुर्ग काँग्रेसची मागणी…

वेंगुर्ले,ता.०६: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसरलेले असताना देशात मात्र जुनेच दर लागू आहेत. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी नाराजी व्यक्त केली असून केंद्र सरकारने याकडे तात्काळ लक्ष घालून पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत श्री.शेख यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

त्यात असे नमूद केले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर 25 ते 35 टक्के पर्यंत घसरलेले असताना पेट्रोल व डिझेलचे भाव देशात का कमी होत नाहीत ? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी विचारला आहे. जेव्हा पेट्रोल व डिझेलचे भाव वाढतात तेव्हा केंद्र सरकारचे मंत्री पेट्रोल व डिझेलचे भाव सरकारच्या हातात नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात होणा-या कच्च्या तेलाच्या भावावर अवलंबून आहेत असे सांगतात. तर मग आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव हा 25 ते 35 टक्केने घसरला असताना देशातील पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होऊन जनतेला त्याचा फायदा का मिळत नाही? कोरोनाच्या काळात सुद्धा कच्च्या तेलाचे भाव अत्यंत कमी झाले होते परंतू त्या काळातही इंधनाचे दर कमी होऊन जनतेला दिलासा मिळाला नाही.

केंद सरकार जनतेच्या खिश्यावर दरोडा घालत आहे आणि या दरोड्याच्या पैश्यातून धनदांडग्यांची कर्ज माफी करत आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात 120 डाॅलर प्रति बॅरल असा कच्या तेलाचा भाव असताना सुद्धा आजच्यापेक्षा 25 ते 30 टक्के पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होते. आता 85 डाॅलर प्रती बॅरल पेक्षा ही कमी भाव आंतरराष्ट्रीय बाजारात असताना एवढे महाग पेट्रोल व डिझेल का घ्यावे लागत आहे ? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे. आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या कच्च्या तेलाच्या भावाचा फायदा जनतेला व्हावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव तातडीने 25 ते 30 टक्केनी कमी करावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.

\