तळवडे येथे ८ तारखेला शेतकरी व बागायतदारांचा मेळावा…

4
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सहयोग मंडळाचे आयोजन; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची उपस्थिती…

सावंतवाडी,ता.०५: तरुण वर्ग शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळावा हा उद्देश समोर ठेऊन सहयोग ग्रामविकास मंडळ गरड माजगाव व ग्रामपंचायत तळवडे यांच्या सहकार्याने भव्य शेतकरी बागायतदार मेळावा रविवार ८ जानेवारीला सकाळी १० वाजता जनता विद्यालय तळवडे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सयोग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत मंडळाचे उपाध्यक्ष हनुमंत देसाई, सेक्रेटरी मोतीराम टोपले, खजिनदार सुभाष गोवेकर, मोहन कुलकर्णी, राजेंद्र बिर्जे, बाळासाहेब नंदीहळ्ळी, सचिन बिर्जे, शिवाजी आळवे, प्रविण पवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. गोडकर म्हणाले, मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. आतापर्यंत युवकांसाठी स्पर्धा परीक्षा रोजगार मेळावे, वैधू मेळावा आदी विविध उपक्रम आम्ही राबवले. यावर्षी शेतकरी आणि बागायतदार यांच्या हिताच्या दृष्टीने व जास्तीत जास्त युवा वर्ग शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळावा या उद्देशाने शेतकरी बागायतदार मेळावा घेण्याचे ठरवले. आज शेतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाले आहेत. यामुळे तरुण वर्ग तिकडे वळत नाही खर्च आणि उत्पन्न यांचा वेळ बसत नाही, अशी विविध कारणे यामागे आहेत. एकूणच या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकरी बागायतदारांना योग्य मार्गदर्शन या मेळाव्यातून करण्यात येणार आहे. यामध्ये माती परीक्षण, शेतीमधील विविध रिसर्च व शेती बरोबर शेतीपूरक व्यवसाय कोणते करावे यासंदर्भात तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये माती परीक्षण व त्याचे महत्त्व यासाठी कणकवली येथील स्वामीं लॅब सोल्युशनचे चेतन प्रभू, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व खत व्यवस्थापनासाठी आरसीएफ शेतकरी प्रशिक्षण संस्था अलिबाग मुख्य प्रबंधक हेमंत कुमार गुरसाले, कोकणातील शेतकऱ्यांकरता मत्स्य शेतीचे विविध पर्याय मत्स्य शास्त्रज्ञ उद्यानविद्या महाविद्यालय मुद्दे येथील डॉक्टर नितीन सावंत, कोकणातील शेळीपालन व्यवसायातील संधी कॅलिफोर्निया तळवडेचे सुमित भोसले तर आंबा व काजू पीक संरक्षण या संदर्भात कृषी कीटक शास्त्रज्ञ फळ संशोधन केंद्र वेंगुर्ल्याचे विजयकुमार देसाई, याचबरोबर शेती फळबागायती संदर्भातील शासनाच्या योजना व सवलती याची माहिती देण्यासाठी कृषी पर्यवेक्षक सावंतवाडी यशवंत गव्हाणे उपस्थित राहणार आहेत.

श्री. गोडकर पुढे म्हणाले, या मेळाव्यामध्ये भव्य कृषी प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. या ठिकाणी कृषी उपयुक्त अवजारे कीटकनाशके खत बी बियाणे नर्सरी शेतीशी निगडित उत्पादने यांचे स्टॉल उभारले जाणार आहे या मेळाव्यासाठी लय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे कार्याध्यक्ष राणीसाहेब सौ शुभदा देवी भोसले, डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संचालक डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित राहणार आहे. तरी तळवडा पंचक्रोशीतील शेतकरी बागायतदार यांनी या वेळेचा लाभ घ्यावा.

\