नायब तहसीलदार संघटनेकडून बेमुदत कामबंद आंदोलन…

10
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; ग्रेड पे वाढवण्यासाठी वेधले शासनाचे लक्ष…

सिंधुदुर्गनगरी,ता.०३: नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग २ चे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. या पदांचा ग्रेड पे वाढविण्यासाठी संघटना १९९८ पासून शासन पातळीवर पाठपुरावा करीत आहे. मात्र, आश्वासने देवुनही त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने राज्यभर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हे आंदोलन सुरू झाले असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना आज देण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांना आज महाराष्‍ट्र राज्‍य तहसिलदार – नायब तहसिलदार संघटना कोकण विभाग, तहसिलदार व नायब तहसिलदार असोशिएशन शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, महाराष्‍ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग- २ हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. परंतू नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत १९९८ पासून आज पर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरापर करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरुन अद्यापही देण्यात आलेली नाही.
संघटनेने नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-२ यांचे ग्रेड पे रुपये ४८००रुपये मंजूर करण्याचे अनुषंगाने शासनाला यापूर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु तत्कालीन शासनाने या संदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही. अपर मुख्य सचिव व मंत्री महसूल, वित्तमंत्री यांचेसह झालेल्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याची कोणतीही अमंलबजावणी न झाल्याने तसेच पी. के. बक्षी या वेतन त्रुटी समितीने नायब तहसिलदार यांचा ग्रेड पे वाढविण्याबाबत सादरीकरण केले आहे. तसेच कामाचे स्वरुप, जबाबदारी इत्यादी ग्रेड पे ४८०० रुपये आहे हे माहिती असूनही व वारंवार देवूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग- २ यांचे ग्रेड पे ४८०० रुपये करणेबाबतच्या सादर केलेल्या मागणीची दाखल न घेतल्यामुळे या रास्त व न्याय मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भूमीका स्विकारण्याचा एकमताने निर्णय राज्‍य संघटनेद्वारे घेण्यात आला आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

\