पाककृती सुधारणा योजनेच्या सदस्यपदी नितीन वाळके…

10
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची समिती गठित…

मालवण, ता. १८ : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्यस्थितीतील पाककृतीत सुधारणा सुचविण्याच्या समितीमध्ये सदस्य म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या पाककृतीची निश्चिती करण्यात आली आहे. मागील काही वर्षांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आरोग्य विषयक अहवाला मधून विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी असणे विद्यार्थ्यांचा बीएमएल कमी, ज्यादा असणे या बाबी निदर्शनास आल्याने तसेच केंद्र शासनाने योजनेअंतर्गत स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांची निवड करण्यात आली आहे. तरी पोषण आहारामध्ये काही सुधारणा किंवा अन्य काही उपाययोजना सुचवायच्या असल्यास संबंधितांनी श्री. वाळके यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

\