भाजपा कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लागतील…

42
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नितेश राणे; कणकवली शहर भाजपा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…

कणकवली,ता.२० : शहरातील शहर भाजपाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणेंचे हस्ते आज करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून कणकवली शहरवासीयांचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील. हे कार्यालय कणकवली शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचे केंद्र बनेल असा विश्वास आमदार श्री. राणे यांनी व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, मेघा गांगण, शिशिर परुळेकर, विराज भोसले, कविता राणे, रवींद्र गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, बंडू गांगण, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महेश सावंत, बाळा सावंत, अभय राणे, कल्याण पारकर, राज नलावडे, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, हितेन कामतेकर, नवराज झेमणे, बाळा पाटील, अभय राणे, संदीप राणे, चारुदत्त साटम, शिवसूंदर देसाई, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, गणेश तळगावकर, प्राची कर्पे, राजश्री धुमाळे, सुशील पारकर, गीतांजली कामत, संजना सदडेकर, आदी उपस्थित होते.

\