सावंतवाडीच्या खुशलची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड…

34
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१५: नुकत्याच मुंबई-वरळी येथे पार पडलेल्या कॅप्टन एस. जे. इजिकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील खेळाडू खुशल संभाजी सावंत याने १० मी. पिप साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन ४०० पैकी ३६८ गुणांची नोंद करत उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याची ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप व वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप या दोन्ही पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी सबयुथ, युथ,जुनिअर व सिनियर या चारही गटात निवड झाली आहे. यापूर्वी खुशल याने डेरवण युथ गेम्स मध्ये २८२ गुणांसह रौप्य पदक पटकावले होते. त्याच्या प्रशिक्षकांना त्याच्या कडून अश्याच कामगिरीची अपेक्षा पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये आहे.
खुशल हा सावंतवाडी मधील उपरकर शूटिंग अकॅडमी मध्ये सराव करत असून त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. त्याच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

\