बांदा येथील “बे-लिफ द किचन”चा उत्साहात शुभारंभ…

13
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०३: येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या “बे-लिफ द किचन”चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी बांदा तसेच परिसरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी बांदा येथे सुरू झालेले हे किचन ग्राहकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल, असा विश्वास यावेळी ग्रुपचे संचालक परवेझ सय्यद यांनी व्यक्त केला. काल या किचनचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बांदा उपसरपंच जावेद खतिब, दिपक सावंत, साईनाथ धारगळकर, संदिप बांदेकर आदींनी भेट दिली. या ठिकाणी एकाच छताखाली शोरमा, बर्गर, पिझ्झा, सॅण्डविच, मोमोज, स्पेशल बिर्याणी आणि तंदुरी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खवय्यांनी या किचनला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

\