कणकवलीत रेल्वे ट्रॅकवर महिलेची आत्महत्या

23
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.११ : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस खाली महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन येथे घडली. या घटनेनंतर मांडवी एक्सप्रेस सुमारे अर्धा तास स्थानकातच थांबून होती.
मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेस सकाळी ११.४८ च्या सुमारास कणकवली स्टेशनवर आली. त्याचवेळी तेथे उभे असलेल्या अंदाजे ५२ वर्षीय महिलेने प्लॅटफॉर्म समोरच रुळावर झोकून देत आत्महत्या केली. सदर महिलेच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राजेश सुरवाडे, विनोद पाटील, युवराज पाटील, गणेश खांदरे, विपुल मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक रुपेश गुरव, चंद्रकांत माने, मकरंद माने आदी घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून त्या महिलेने टोकाचे पाऊल का उचलले हे समूज शकले नाही.

\