अर्चना घारेंच्या रुपाने सावंतवाडी मतदार संघाला महिला आमदार देवूया…

8
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अमित सामंताचे आवाहन; पवारांशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकविण्याची वेळ..

सावंतवाडी,ता.०१: अर्चना घारेंच्या रुपाने सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर महिला आमदार बसवायचा आहे. त्यादृष्टीने कामाला लागा. आगामी काळात होणार्‍या निवडणूकीसाठी त्यांचे हात बळकट करा, असे आवाहन आज येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले. दरम्यान सौ. घारे या सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला मदतीला धावून जाणार्‍या आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठिशी येथील जनतेने ठामपणे उभे राहून शरद पवारांशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवावा, असे ही त्यांनी सांगितले.
सौ. घारे यांचा वाढदिवस आज राष्ट्रवादीसह अन्य पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी श्री. सामंत बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांमधून केल्या जाणाऱ्या घोषणा या ऐकवण्यापूर्तीच नको तर सर्व कार्यकर्त्यांचे पाठबळ असले तरच आपण अर्चना घारेंचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करू शकू. सौ. घारे या गेली अनेक वर्षे राजकारणामध्ये सक्रिय होऊन अतिशय चांगल्या दर्जाचे काम करत आहेत. मी मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्या पाठिशी खंबीरपणे नेहमी उभा राहीन, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. वाढदिवसानिमित्त त्या सामाजिक उपक्रम राबवत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी भोसले यांनी घारेंना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सक्षम नेतृत्व म्हणून घारेंचे नाव विधानसभेसाठी पक्षातून एकमतांने पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी एकत्र येवून त्यांचे हात बळकट करावे आणि त्यांना विजयी करुन सावंतवाडी मतदार संघाचा विकास करण्याची संधी द्यावी.
यावेळी सौ. घारे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, या ठिकाणी माझ्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात गर्दी पाहून मी भारावून गेले आहे. येणार्‍या काळात माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या मतदार संघातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सचिन पाटकर तर आभार तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी मानले.
यावेळी संदिप घारे , बाळ चमणकर, राजन म्हापसेकर, रेवती राणे, सायली दुभाषी, सागर नाणोसकर, विशाल जाधव, सुदेश आचरेकर, दिपीका राणे, देवेंद्र टेमकर, सावली पाटकर, योगेश कुबल, आत्माराम ओटवणेकर, बाळ कनयाळकर, समीर वंजारी, संदीप गवस, जयप्रकाश खानोलकर, रशीद शेख, नईम मेमन, हिदायतुल्ला खान, विनायक परब, बावतीस फर्नांडिस, वजीर शेख, पुजा दळवी, प्रदीप चांदेलकर, सुदेश तुळसकर, उल्हास नाईक, जयप्रकाश तमनकर आदी उपस्थित होते.

\