“कातळशिल्प डेस्टिनेशन”म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राधान्य द्यावे…

8
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सतिश लळीत; जिल्ह्याचे पर्यटन फक्त समुद्रकिनाऱ्यापर्यंत मर्यादित नको…

सावंतवाडी,ता.२४: कोकणात असलेल्या अश्मयुगीन कातळशिल्पांच्या ठिकाणी आवश्यक ती सुविधा दिली गेल्यास पर्यटन क्षेत्राला वेगळी दिशा मिळू शकते. त्या दृष्टीने “कातळशिल्प डेस्टिनेशन” पर्यटन स्थळ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राधान्य देण्यात यावे, असे मत कातळशिल्प अभ्यासक सतिश लळीत यांनी केले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन फक्त समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित राहू नये तर गडदुर्ग, मंदिरे, तलाव, खाड्या, बंदरे यासारख्या सर्व बाबींचा विचार व्हावा, आणि त्या माध्यमातून रोजगाराला आणि पर्यटनाला दिशा मिळावी असे त्यांनी सांगितले. मुंबई येथील पाटकर वर्दे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. गुरुनाथ पंडित, प्राचार्य प्रतिभा गायकवाड, मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर, सविता धावडे आदी उपस्थित होते.

\