दीपक केसरकरांवर बोल्लात तर नक्कीच “हॅट्रीक” कराल…

206
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिंदे गटाचा राजन तेलींवर हल्लाबोल; युतीचा धर्म विसरल्याची टिका…

सावंतवाडी,ता.१५: दीपक केसरकरांना जागा दाखविण्याची भाषा करणारे राजन तेली युतीचा धर्म विसरले आहेत. त्यामुळे ते असेच बोलत राहिलेत तर नक्कीच हॅट्रीक करतील, असा टोला आज येथे पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी व माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी लगावला. दरम्यान शहरातील नळपाणी योजना आणि माजगाव धरणाच्या कामाचे भुमिपुजन करणार्‍या तेली यांनी चांगले केले त्यांच्याबाबत न बोललेच बर, असाही त्यांनी चिमटा काढला.

श्री. दळवी व पोकळे यांनी आज या ठिकाणी तेली यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, या ठिकाणी श्री. तेली हे केसरकर यांच्यावर बोलत आहे हे चांगले आहे. ते असेल बोलत राहिले तर नक्कीच हॅट्रीक करतील, असा त्यांनी टोला लगावला. ते या ठिकाणी युतीचा धर्म विसरले आहेत. त्यामुळे नियोजित कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत असताना त्यांनी आधीच जावून भूमिपुजन केले. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. त्यांच्या बद्दल काय बोलणार? असा उलट सवाल त्यांनी केला

\