शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यात धडे देणार्‍या शिक्षकानेच विद्यार्थ्याचा आवळला गळा…

9749
2
Google search engine
Google search engine
Google search engine

व्हिडीओ व्हायरल; प्रकार क्रुर, संबंधितावर कारवाई करा, जिल्हावासीयांची मागणी…

कुडाळ,ता.२९: अभ्यासाचे धडे देणार्‍या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याचा गळा आवळल्याचा प्रकार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत घडला आहे. वर्गातील अन्य एका विद्यार्थ्याने थेट मोबाईलवर व्हिडीओ बनविल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितली. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली असून या प्रकाराबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण विभाग नेमकी कोणती भूमिका घेतो, हे पाहणे गरजेचे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हा प्रकार जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत घडला आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या डोक्यात मारल्यानंतर तो शिक्षक त्याचा थेट गळाच आवळत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. ही घटना चार दिवसापूर्वीची असून आता ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत कुडाळातील नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. यात संबंधित शिक्षक अशाच प्रकारे मारहाण करतो, असे अनेक प्रकार यापुर्वी घडले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच झालेल्या प्रकारानंतर आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न झाला असला तरी व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अशा प्रकारे क्रुरतेने वागणार्‍या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हावासीयांकडून होत आहे.

\