हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अनिल खोचरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपात…

139
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता. ०८ : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हरकुळ बुद्रुक येथील उबाठा ग्रामपंचायत सदस्य अनिल खोचरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्र करत आज आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टीत तुकाराम खोचरे , संतोष परब , विशाल परब , गुंडु परब , दुर्वांक परब , तन्मय परब , प्रशांत अपराज , प्रविण परब , नारायण खोचरे , जयप्रकाश खोचरे , मंगेश राऊळ , महेश शिरसाट , सुधाकर वाळके , संजय तोरस्कर , रिजवान पटेल ,शाहरुख पटेल , न्यामद पटेल , सुभाष सोहनी , दिप खोचरे , सरफराज शेख , विनोद वर्देकर , सुहास ढवण , यशवंत खोचरे आदींसह उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गोट्या सावंत , तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलींद मेस्त्री, राजु पेडणेकर, बुलंद पटेल आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

\