इन्सुली व मळगाव घाटीतील धोकादायक जीर्ण‌ झाडे तोडा…

84
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अनिल केसरकर; सावंतवाडी वनविभाग सुशेगाद असल्याचा आरोप…

सावंतवाडी,ता.२०: इन्सुली व मळगाव घाटीतील काही झाडे जीर्ण झाली आहेत. त्या ठिकाणी पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तात्काळ दखल घेऊन धोकादायक झाडे तोडण्यात यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी वनविभागाकडे केली आहे. ही झाडे धोकादायक असल्याबाबत आणि ती तोडण्याबाबत वारंवार वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात आला, परंतु वनविभागाचे अधिकारी सुशेगाद आहेत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत श्री. केसरकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, सावंतवाडी इन्सुली मार्गावरील इन्सुली घाटात तसेच मळगाव घाटात अनेक झाडे धोकादायक अवस्थेत असून पावसाळ्यात ही झाडे रस्त्यावर अथवा वाहनचालकांवर पडून जिवीत अथवा वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. या पूर्वी देखील या मार्गावर झाडे पडण्याचे प्रकार घडलेले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगात असून या मार्गावरील तसेच मळगाव घाटातील सर्व धोकादायक झाडांचा तातडीने सर्वे करण्यात यावा व या मार्गांवरील अशी झाडे तातडीने तोडून टाकावीत, अन्यथा पावसाळ्यात या मार्गावर झाडे पडून जिवीत अथवा वित्त हानी झाल्यास त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व वन खात्याला जबाबदार धरण्यात येईल असे यात म्हटले आहे.

\