सावडाव धरणा संदर्भातील बैठक प्रांताधिकारी यांनी केली रद्द…

622
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सतीश सावंत व गोट्या सावंत यांच्यात शाब्दिक खडाजंगी…

कणकवली, ता.२० : सावडाव धरणासाठी जमिन गेलेल्या शेतकऱ्यांचा समस्या व कैयफिती ऐकूण घेण्यासाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहलीदार कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सतीश सावंत व भाजपचे पदाधिकारी संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यात जोरदार शाब्दीक खंडाजंगी झाली. त्यामुळे काही वेळ वातावरण तंग झाले. सदरची बैठक प्रांताधिकारी यांनी रद्द केल्यामुळे निष्फळ ठरली.
जल संधारण विभागाकडून सावडाव धरणाचे काम सुरु आहे. मात्र, शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम धरणाचे काम सुरु करण्यात आले. जल संधारण विभागाच्या या कृतीविरोधात शेतकरी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणाचे काम बंद पाडले होते. सावडाव धरणग्रस्तांच्या समस्या व कैयफिती ऐकूण घेण्यासासाठी तहसीलदारांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीला तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जलसंधारण विभागाचे श्री. शिरोडकर, शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, माधवी दळवी, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सावडावचे माजी सरपंच दत्ता काटे, परशुराम झगडे, संदीप सांवत, ठेकेदार बाप्पा मांजरेकर यांच्यासह धरणग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
जगदीश कातकर यांनी जलसंधारण विभागाने धरण प्रकल्पांबाबत काढलेल्या सुधारित जीआरचे वाचन करून शासनाने नव्याने घातलेले निकषही उपस्थितांना समजून सांगितले. धरणग्रस्तांच्यावतीने वैभव सावंत यांनी त्यांचे प्रश्न व समस्या प्रांताधिकाऱ्यांकडे मांडल्या. धरणासाठी जमिन दिलेल्या शेतकऱ्यांना शासन केव्हा मोबदला देणार आहे, यासह अन्य प्रश्न त्यांनी उपस्थितीत केले.
यावर प्रांताधिकाऱ्यांनी धरणग्रस्तांना शासनाकडून मोबदला मिळण्यासाठीची असलेली प्रक्रिया समजून सांगितली. त्यानंतर सावंत यांनी या धरणासाठी ज्या शेतकऱ्यांचा जमिनी गेल्या असून त्याची सर्व माहिती लेखी स्वरुपात द्यावी, अशी मागणी त्यांनी शिरोडकर यांच्याकडे केली. मात्र, सावंत यांच्या मागणीला गोट्या सावंत यांनी आक्षेप घेत करंजे धरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून सतीश सावंत व गोट्या सावंत, संदीप सावं यांच्यात जोरदार खंडाजंगी झाली. सावडाव धरण संर्दभात बैठक बोलवण्यात आली असताना काही मंडळींकडून करंजे धरणाचा विषय काढून बैठकीची दिशा भरकट असल्याचा आरोप सावंत यांनी करत करंजे धरणाचे काम त्वरित थांबविण्याची मागणी त्यांनी शिरोडकर यांच्याकडे केली. तर सावडाव धरण प्रकल्पग्रस्तांचे काही आक्षेप व हरकती असतील तर त्यांनी जलसंधारण विभागाकडे अर्ज करावेत, त्यानंतर संबंधित विभागाने त्यांचे उत्तर द्यावे, धरण प्रकल्पाची सर्व माहिती सार्वजनिक करू नये, अशी सूचना गोट्या सावंत यांनी शिरोडकर यांनी केली. बैठकीत सावडाव धरणप्रश्नी चर्चा न होता, करंजे धरणाच्या मुद्दावरून संदेश सावंत व सतीश सावंत, कन्हैया पारकर यांच्यात जोरदार खंडाजंगी झाली. त्यामुळे प्रांताधिकारी यांनी सदरची बैठक रद्द केली. बैठक रद्द केल्यानंतर काही धरणासाठी वाद होत असेल तर आम्हाला धरणच नको, असा सूर आळवला.

\