तळवडे येथील व्यापाऱ्यांची अर्चना घारेंनी घेतली भेट…

178
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२३: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी तळवडे येथील व्यापारी, बांधकाम कामगार व हॉटेल व्यवसायिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वाढती महागाई, खाद्यपदार्थांचे वाढते भाव, व्यावसाय चालवण्यासाठी लागणारी कसरत आदी समस्या जाणून घेतल्या.
यावेळी संतोष भैरे, निवृत्ती आमरे, एकनाथ सावंत, मिलिंद पवार, अमोल पावनाजी, दत्तप्रसाद कुंभार आदी व्यापाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे होडावडा गावचे माजी अध्यक्ष विलास नाईक, प्रकाश नाईक, वेंगुर्ला तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री. पेडणेकर, सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षा नितिशा नाईक, युवती अध्यक्षा सावली पाटकर, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

\