कुडाळ-कविलकाटे येथे घरावर झाड कोसळून नुकसान… 

223
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२४: तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या घरावर भेडलेमाड व कोकमचे अशी २ झाडे कोसळली. यात त्यांचे १ लाख २० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने घरात असलेले सदस्य बचावले आहेत. दरम्यान त्यांना लवकरात-लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल झालेल्या मुसळधार पावसाने श्री. दळवी यांच्या घरावर २ झाडे कोसळून त्यांचे १ लाख २० हजाराचे नुकसान झाले. दरम्यान घरात मोठा आवाज झाला त्यामुळे घरातील सर्व माणसे घराच्या मागील बाजूने बाहेर पडली. त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र त्यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर आणि कौलारू छप्पर कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात-लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळाले, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

\